मकर संक्रांतीचे
उखाणे
डॉ.पल्लवी
बारटके
नवीन वर्षाची सुरुवात होताच चाहूल लागते ती
येणाऱ्या पहिल्या सणाची, स्नेह, प्रेमभाव, नात्यातील गोडवा वृद्धिंगत करणाऱ्या मकर
संक्रांतीची. ‘तिळगुळ घ्या गोड गोड बोला’
असं म्हणत गृहिणींची लगबग सुरू होते ती हळदीकुंकवासाठी.
हळदी-कुंकू म्हंटलं की उखाणे हे
आलेच. तिळगुळाचा गोडवा
पती-पत्नीच्या नात्यात जपणारे असेच काही उखाणे खास माझ्या मैत्रिणींसाठी.👇
1) मकर
संक्रांत म्हणताच आठवते
तीळ अन गुळाची जोडी निश्चित
तसाच __राव व __
जोडा आहे पूर्वजन्माचे संचित.
2) तिळाची
उब लाभू दे तुम्हाला
गुळाचा
गोडवा येऊ दे जीवनाला
यशाचा
पतंग उंच गगना वरती
____ रावांची अशीच अखंड राहो प्रीती माझ्यावरती
3) सोनेरी
किरणे घेऊन आली मकर संक्रांतीची उषा
____रावांचे नाव घेते मी _____ यांची स्नूषा
4) गुळाची
गोडी त्याला तिळाची जोडी नात्यात आला स्नेहाचा गंध
____रावांशी जुळले जन्मोजन्मीचे ऋणानुबंध
5) हळदी-कुंकवाचा
सण खुलवी नाते पती-पत्नींचे
प्रेमाचे, स्नेहाचे, आदराचे, अभिमानाचे
तेच नाते माझे नि ______रावांचे
शब्दांच्या पलीकडले,शब्दांच्या पलिकडले
No comments:
Post a Comment