Tuesday, September 29, 2020

चिरोटे---प्रियांका गाडे

 

खुखुशी

चिरोटे

पाककृती

 

 

 

साहित्य –

 

क्र.

साहित्य   

प्रमाण

मैदा

३ वाटी

रवा

१/२ वाटी

कॉर्न फ्लॉवर

३ चमचे

तेल

पाव वाटी

तूप   

पाऊण वाटी

मीठ

चवीनुसार

पिठी साखर

२ वाटी

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

कृती –

१.     एका ताटामध्ये पाऊण वाटी तूप विरघळेपर्यंत पळीने फेटून घ्या.

(टीप – गॅसवर गरम करू नये)

२.     मैदा आणि रवा चाळून घ्या.

३.     विरघळलेल्या तुपात रवा-मैदा मिसळून घ्या.

४.     चवीनुसार मीठ टाका(अर्धा चमचा).

५.     पाव वाटी कडकडीत तेलाचे मोहन घाला.

६.     हे सगळे मिश्रण पाणी टाकून हळू हळू मळून घ्या.

७.     पुरी सारखे घट्ट पीठ मळून घ्या.

८.     २ तास झाकून ठेवा.

९.     २ तास नंतर हे पीठ परत एकसारखे मळून घ्या.

१०.  सगळ्या पिठाचे पोळीसाठी करतात तसे समान आकाराचे गोळे करा.

११.  एका वाटीत २-३ चमचे कॉर्न फ्लॉवर घेऊन त्यात अंदाजे तेल टाकून सरसरीत पेस्ट करून घ्या.

१२.  केलेल्या गोळ्यांपैकी ३ गोळ्यांच्या पोळ्या लाटून घ्या.

१३.  एक पोळी घेऊन त्यावर कॉर्न फ्लॉवर ची पेस्ट व्यवस्थित पूर्ण पोळीवर लावून घ्या.

१४.  ह्या लावलेल्या पेस्टवर दुसरी केलेली पोळी ठेवा.

१५.  पहिल्या पोळी प्रमाणे दुसर्‍या पोळीवर सुद्धा ही पेस्ट व्यवस्थित लावून घ्या.

१६.  त्यावर तिसरी पोळी ठेवा आणि उरलेली पेस्ट त्यावर व्यवस्थित लावून घ्या.

१७.  ह्या तिन्ही पोळ्या रोल करून घ्या.

(टीप – ३ एव्हजी २ पोळ्यांचा रोल सुद्धा चालेल)

१८.  अश्या पद्धतीने उरलेल्या पोळ्यांचे रोल करून घ्या.

१९.  रोल केलेल्या पोळ्यांचे समान आकाराचे तुकडे सूरीने करून घ्या.

२०.  एक एक तुकडा घेऊन तो मध्यावर हलक्या हाताने लाटून घ्या.

२१.  अशाप्रकारे सगळे चिरोटे लाटून घ्या.

२२.  हे लाटलेले चिरोटे मंद आचेवर, छान पदर सुटेपर्यंत, गुलाबी रंग येईपर्यंत तळून घ्या.

२३.  हे तळलेले चिरोटे दोन्ही बाजूंनी पिठीसाखरेमध्ये घोळून घ्या.

२४.  हे पिठीसाखरेमध्ये घोळेलेले चिरोटे टिशू पेपरवर थोडा वेळ ठेवा.(एकावर एक न ठेवता वेगळे ठेवा)

२५.  तुमचे खुखुशी चिरोटे तयार...!!!

 

 

 






 

                                                     प्रियांका गाडे.

No comments:

Post a Comment