दिवाळी
मनामनांत हर्षाच्या उजळीत चंद्रज्योती
आली आली सोनपावलांनी आली दीपावली आली
सप्तरंगांची उधळण करी दारात रांगोळी
पणत्यांच्या प्रकाशात सारी घरे उजळली
दारोदारी नाना रंगांचे आकाशकंदील झुलती
किल्ले आणि फटाक्यात बालगोपाळ रमती
सुगंधी तेल उटण्याने अभ्यंगस्नाने झाली
नव्या पोषाखात सानथोर सारी सजलीधजली
लाडू,करंज्या ,चकल्या आणि खमंग कडबोळी
अनारश्यांच्या जोडीला राजस शंकरपाळी
अश्या फ़राळाने घरोघरी ताटे भरली सजली
प्रेमाने शेजारी- पाजारी त्यांची देवघेव झाली
लक्षुमीची करू पूजा गाऊ तिचे गुणगान
जन्म आणि कर्मभूमीसाठी मागू सुखसमृद्धीचे वरदान
भाऊबीज पाडव्याला हक्काची ओवाळणी
वाट पाहती घरोघरी साजणी आणि बहिणी
अशी चार दिवसांची दिवाळी येते आणि जाते
जाता जाता वर्षभरासाठी आनंदाची भेट देते
सौ .नम्रता नितीन देव
No comments:
Post a Comment