Wednesday, November 18, 2020

परिराणी-------श्री. संतोष राक्षे

 

परिराणी

 

लालचुटुक गुलाबी गाडीला लावले पंख गुलाबी मोरपिसांचे

पांढरे घोडे गाड़ी ओढायला आणि बसायला सीट चमचम हिऱ्यांचे

झुबकेदार मिशीवाला राजकुमार होता तिचा गाडीवान चालक

बाबांकडे पाहून अदबीने म्हणतो कसा, कुठे जायच बोला मालक

 

गाडीतून आकाशाची सफर म्हणजे धमाल खूप सारी

चंद्राचा गरगर भोवरा करून मीच घेतली गिरकी भारी

जाताजाता झोपलेल्या सूर्याच्या डोक्यावर मारली टपली

ओरडा नको म्हणून चांदण्याच्या चादरीआड़ हळूच लपली

 

मध्येच मग लागली एका परीराणीची नगरी काचेची नगरी

चॉकलेट सिंहासनावर ऐटबाज परी, जणू आई झाली नवरी

लुपाछूपी खेळायला तिथे हजर खूप ताया, हरीण नी ससा

बाहुली हाती देत परीराणी म्हणते कशी.... आता तरी तुम्ही हसा

 

रात्री जेवायला तीने दिले .. आईसक्रीमचे लाडू, त्यावर मारला ताव

सोबतीला होते पॉपकॉर्नचे गुलाबजामून आणि चमचमीत मिसळपाव

मांडीवर थोपटत मग तिने सांगितली.. गोष्ट एक…. सात बुटक्यांची

खऱ्या परीच्या कुशीत निजवत..

म्हणत गेली परिराणी स्वप्नांची ....उद्या येईन मी नक्की परत

No comments:

Post a Comment