Wednesday, November 18, 2020

कोथिंबीर वडी-----------मनाली सहस्रबुद्धे

 

साहित्य :

 

कोथिंबीर,डाळीचं पीठ,तांदूळ पीठ,ओवा,हळद,लाल तिखट,मीठ,तेल

 

कृती :

 

प्रथम एक जुडी कोथिंबीर नीट निवडून घ्यावी.नंतर धुवून थोडी ओलसर असतानाच बारीक चिरून घ्यावी.

 

बारीक चिरलेल्या कोथिंबिरीत २ मोठे चमचे डाळीचे पीठ,२ छोटे चमचे तांदूळ पीठ,चिमूटभर ओवा,हळद,चवीनुसार मीठ आणि आवडीनुसार लाल तिखट घालून सर्व मिश्रण एकजीव करून घ्यावे.

 

मिश्रण खूप ओले किंवा खूप कोरडे असू नये.कोथिंबिरीच्या ओलसर पणात जर सर्व एकजीव झाले नाही तर गरजेनुसार थोडे पाणी घालावे.

 

वरील मिश्रण एका गोल डब्यात किंवा भांड्यात नीट पसरवून घ्यावे.कुकर मध्ये थोडे पाणी घेऊन कोथिंबीर वडीचे मिश्रण असलेला डबा किंवा भांडे वाफवावयास ठेवावे. कुकर ची शिट्टी लावू नये. साधारण १५ ते २० मिनिटात छान शिजलेली कोथिंबीर वडी तयार होते.

 

कोथिंबीर वडी चे मिश्रण थोडे गार झाल्यावर त्याच्या आपल्या आवडीनुसार वड्या पाडून घ्याव्या.वड्या पाडेपर्यंत गॅसवर तेल गरम करण्यासाठी मध्यम आचेवर ठेवावे. तेल गरम झाल्यावर वड्या तळून घ्याव्या.

 

गरमागरम खुसखुशीत कोथिंबीर वडी पुदिना चटणी बरोबर अतिशय चविष्ट लागते.

 

तळ टीप : कोथिंबीर वडीचे मिश्रण कालवताना त्यात आवडत असल्यास थोडी थालीपीठ भाजणीसुद्धा घालू शकता. वड्या अजून खमंग होतात.









No comments:

Post a Comment