Friday, May 25, 2018

संपादकीय

महाराष्ट्र मंडळ अबुधाबीच्या जिव्हाळयाचे असलेल्या "बहर" ह्या  मासिकाच्या प्रकाशनाची जबाबदारी २०१८-१०१९ ह्या कार्यकाळासाठी आमच्याकडे सोपविण्यात आली आहे. खरे तर हा बहरलेला वटवृक्ष अजून कीर्तिमान बनवण्याची जबाबदारी आम्हास एक मोठे आव्हान आहे.        आपल्या सहकार्याच्या जोरावर आम्हास हा महामेरू पेलविण्याचे बळ प्राप्त होईल अशी आशा. ह्या हित्यरूपी हिऱ्यास अजून काही पैलू तयार करण्याचा आम्हा संपादकाचा मानस आपल्या सर्वांच्या  सहकार्याने नक्कीच तडीस जाईल.
संपादक म्हणून आम्ही हे ई-सदर जास्तीत जास्त वाचकांपर्यंत पोहचविण्याचा संपूर्ण प्रयत्न करू.  आपणदेखील "एकमेका साहाय्य करू" या ओव्याप्रमाणे  हे सदर बहुसंख्य वाचकांपर्यंत पोहोचवावे हि विनंति.
ह्या कार्यकाळातील पहिल्या अंकासाठी महाराष्ट्र दिनी केलेल्या आवाहनाला उत्तम प्रतिसाद देत आम्हास खाली नमूद केलेले साहित्य प्रकाशित करण्याचा बहुमान प्राप्त होत आहे.
१. महाराष्ट्र माझा - डॉ.सौ. पल्लवी बारटके
२. माझी माती -  सौ. निहारिका सावरकर
३. दुर्गभ्रमंती  - श्री. सारंग आपटे
४. माझे मराठी आजोळ - सौ. रुपाली कीर्तनी.
५. माझ्या मातीतील मौल्यवान रत्ने - श्री. मनोज करंदीकर
६. हडप्पा -पुस्तक परीक्षण  - श्री. मंदार आपटे
मंडळी, आपल्या सूचना तसेच प्रकाशित केलेल्या साहित्याबाबतीत असलेले मत अथवा अभिप्राय आम्हापर्यंत नक्की पोहचवा. सर्व लेखक आणि वाचक मंडळींचे धन्यवाद.

आपले विनम्र,

महाराष्ट्र मंडळ अबूधाबी
कार्यकारी समिती२०१८-२०१९

संपादक मंडळ -  सौ. रचना महेंद्र गाडगे आणि
                         श्री  संतोष दगडू राक्षे.
 

No comments:

Post a Comment