Saturday, August 22, 2020

मनातला गणेश मनी वसावा.....:- सौ. श्रेया शैलेश पटवर्धन

 

मनातला गणेश मनी वसावा...


 गं गणपतये नमः

श्री गणेशाला आवाहन करून आपण आपल्या प्रत्येक कार्याची सुरुवात करतो . कुठलीही अडचण आपल्या कामात येऊ नये अशी इच्छा मनात धरतो आणि तूच आमचं रक्षण कर असेही सांगतो .


गणपतीच्या मूर्तीचं बारीक निरीक्षण केल्यास आपोआपच आपल्या प्रार्थनेचे गूढ लक्षात येते.


शिवपार्वतीचा पुत्र गणेश यातच किती सामर्थ्य आहे !गणपतीला लाभलेल गजमुख अफाट शक्ती चे प्रतिक !त्याचबरोबर आलेले विशाल कर्ण... पूर्ण पृथ्वीतलाचं गाऱ्हाणे सामावून घेतात .


गणपती बाप्पाचे व्यापक शीर आपल्याला सखोल बुद्धिमत्तेची जाणीव करून देते.


गणेशाचे नाजूक श्रीमुख आपल्याला सांगते विचार करून बोला , समोरच्याचे ऐकून तरी घ्या.


गजाननाला लाभलेला अर्धंदंत जाणीव करून देतो जे आपले आहे त्याला कायम जपा.


श्री गजाननाचे अनिमिष पाहणारे नेत्र सांगतात की लक्ष विचलित होऊ देऊ नका आणि गणपतीबाप्पाचे भले मोठे उदर सर्व प्राणिमात्रांची सुखदुःखे जतन करते .

सुखदुःख हे बेस्ट फ्रेंड आहेत आपले ...दोन्ही सहन करायला शिका!
आणि त्यासाठीच प्रत्येक कार्यारंभी


गणपती बाप्पा मोरया!!!

                                                            सौ. श्रेया शैलेश पटवर्धन




No comments:

Post a Comment