तारका .......
अगदी आत्ताच हवेत गारवा
जाणवू लागला होता .
बाहेर बघितलं तर मस्त वारा
सुटला होता .
गार वार्याच्या स्पर्शाने
मन शहारून आले .
मनात म्हटलं चला थोड फिरून
येऊ .
हल्ली कोरोनाच्या
धास्तीमुळे बाहेर पडावं असं वाटतच नाही .
तरी मास्क लावला आणि पडले
बाहेर !
घड्याळावर नजर पडली तर अकरा
वाजत आले होते .
life फार secured आहे हो Abudhabi मधे !
इथे म्हणजे कधीही बाहेर पडा
भीतीच काहीच कारण नाही .
समोरच गार्डन मध्ये आले आणि
एका बाकावर जाऊन बसले .
सगळी झाडे चंदेरी रंगाची
भासत होती .
जणूकाही सगळ्यांनी चंदेरी
रंग न्याला आहे .
आकाशीच्या तारकांचा प्रकाश
सर्वत्र पसरला होता ..
मोहून गेले मी त्या शीतल
प्रकाशात ...
किती सुंदर दिसत होत्या
तारका ....
इतक्या दूरवरून पण
माझ्यापर्यंत प्रकाशाची उधळण करत होत्या .
मनात म्हटलं या तारकांसारख
आपल्यालाही वागता आलं पाहिजे .
स्वतःच्या अस्तित्वाची
जाणीव नसुन पण प्रकाशत राहिले पाहिजे .
मी आणि फक्त मी !
अर्ध आयुष्य फक्त माझाच
विचार करण्यात व्यतीत होतं ....
त्या तारकांच सगळच जीवन
फक्त प्रकाशमान होण्यात जातं .......
किती स्वावलंबी आहेत
तारका.....
मनात विचार आला सतत आपल्या
गरजा वाढत असतात ,
अगदी मरेपर्यंत काहीतरी
इच्छा असतेच !
चला हे परावलंबी विचार आता
थांबवूया ....
ह्या तारकांसारखे
तेजपुंजाळत दुसऱ्यालाही आनंद देऊया .......
श्रेया पटवर्धन
No comments:
Post a Comment