सावली
सावली कायम आपल्या सोबत असते
कधी मोठी असते कधी छोटी असते
साथ मात्र कुठल्याही परिस्थितीत सोडत नसते
माध्यान्हीला सूर्य जेव्हा आग ओकत असतो
तेव्हा वेढुन घेते आपल्या अस्तित्वाला
जणू त्या उन्हाचे चटके स्वतःवरती घेते
स्वतः चटके सोसुन सोबतीचा गारवा देते
मी तुझी
अशीच सावली आहे
सतत तुझ्यासोबत तुझ्या मागोमाग
कारण मला माहिती आहे
पुढे होऊन माझी वाट तू सोपी करतो आहेस
समोरून येणारे ऊन स्वतःवर घेऊन
मला सावली देतो आहेस
आता आयुष्याच्या माध्यान्हीला
तुझी सावली तुझ्यात सामावली
जणू दोन व्यक्तिमत्वे एकरूप झाली
सौ .नम्रता नितीन देव
No comments:
Post a Comment