Tuesday, September 29, 2020

मर्मबंध ....श्रेया पटवर्धन

 

मर्मबंध ....


जे या जन्मातले असतात
कोण जाणे किती पूर्वजन्मातले असतात
म्हणूनच अनोळखी व्यक्ती भेटतात
सहजच आपल्या होतात
हेच ते पूर्वजन्मीचे पाश असतात
काही वेदना देतात
काही वेदना शमन करतात
आणि प्रारब्धाची जाणीव करून देतात
अशीच मला भेटलेली तू ....
बघता क्षणी मनाला भावलेली तू ....
माझ्या मर्मबंधातली तू....


                                                    श्रेया पटवर्धन

No comments:

Post a Comment