Tuesday, September 29, 2020

फणसाची भाजी----मनाली सहस्रबुद्धे

 

साहित्य :

मध्यम आकाराचा कापा फणस,शेंगदाणे,ओलं खोबरं, गुळ, ,३ सुक्या लाल मिरच्या,तेल,हळद,लाल तिखट, हिंग, मोहरी, कडीपत्ता, मीठ.

 

कृती :

प्रथम फणस व्यवस्थित तेलाचा हात घेऊन सोलून घ्यावा. नंतर फणस चिरून त्याचे तुकडे आणि शेंगदाणे एकदा चांगले शिजवून घ्यावे. शिजवलेला फणस आणि शेंगदाणे निथळण्यासाठी ठेवून फोडणीची तयारी करावी.

प्रथम एका कढईत तेल गरम करून घ्यावे.त्यात मोहरी,हिंग,हळद,,३ लाल मिरच्या,कडीपत्ता घालून खमंग फोडणी करावी. फोडणीत शिजेलेला फणस व शेंगदाणे घालून नीट परतून घ्यावे.त्यात थोडे पाणी घालून ओलं खोबरं,गुळ घालून चांगलं एकजीव करून घ्यावं. चवीनुसार मीठ घालून एकदा चांगली वाफ काढावी.

 

तळ टीप :

भाजी तयार झाल्यावर वाढायच्या आधी त्याला वरून पुन्हा एकदा फोडणी द्यावी.

भाजीत पाणी अगदी अंगासरशी ठेवावे.

 

वरून कोथिंबीर पेरून गरमा गरम भाजीचा आस्वाद घ्यावा.




No comments:

Post a Comment