आठवणीत राहणारी एक आठवण
नमस्कार मंडळी ,
महाराष्ट्र
मंडळाने मराठी हस्ताक्षर स्पर्धेचे आयोजन केले होते . मोठ्या उत्साहात स्पर्धा
जाहीर झाल्या झाल्या सभासदांनी भराभर आपली नावे रजिस्टर केली, जवळपास
४५ नावे आली, कारण बर्याच वर्षानंतर मराठी हस्ताक्षर
स्पर्धेचे आयोजन झाले होते. यावर्षी ची हस्ताक्षर स्पर्धा online होती,
पण तरीही सगळ्या सभासदांना खूप आनंद झाला आणि
सोबत उत्साह तर होताच, मग आयोजकांनी व्हाट्सअप वर एक ग्रुप तयार केला, जेणेकरून
स्पर्धेचे जे नियम आणि अटी असतील त्या सगळ्यांपर्यंत पोहोचतील आणि स्पर्धेसाठी
त्याची मदत होईल आता इथे पण स्पर्धकांचा जोश होता तो खरोखर बघण्यासारखा होता. किती
उत्साहाने सगळे आपापले प्रश्न विचारत होते आणि काही सल्लेही देत होते आयोजक ही
त्यांच्या प्रश्नांना व्यवस्थितपणे उत्तरे देत होते . ४५ जणांना साभाळणे काही सोपं
नव्हतं पण छान निभावले.
हा हा म्हणता स्पर्धेचा दिवस उजाडला आणि सगळे
एकमेकांना स्पर्धेसाठी शुभेच्छा देऊ लागले. आयोजकांनी online स्पष्ट वाचन करून परिच्छेद सांगीतला. सगळ्या स्पर्धकांनी आपल्या
सुरेख अक्षरांत लिहीले आणि आयोजकाकडे फोटो काढून submit केले.
हुश्श ! करून सगळ्यानी मोकळा श्वास घेतला. जणु
परिक्षेचा शेवटचा पेपर सोडवून बाहेर पडलो.
निकाल दुसऱ्या दिवशी सांगणार होते. मग काय चर्चा
करायला अजुन एक दिवस मिळाला. पण त्या दिवशी स्पर्धे बद्दल नाही तर आपआपल्या शालेय
जीवनातील अनुभवावर बोलत होते.
उदाहरणार्थ शिक्षण शैली, शाळेतील
दप्तर, शाळेत लागणारे साहित्य जसे पेन,आणि
पेनाचे प्रकार एवढेच नाही तर मित्र मैत्रिणी ची मस्करी इ..सगळे खुप छान आपआपल्या
आठवणी शेअर करत होते. त्यांचे अनुभव एकायला फार आवडले कारण आमच्या पैकी बरेच जण
प्रौढ मंडळी होती. त्यांच्या त्या गप्पा ऐकून असे वाटत होते जणू आपले आई बाबाच
त्यांच्या जमन्यातील गोष्टी सांगत आहेत. त्यांच्या गप्पांमध्ये एवढे रमायला झाले
की घरातील कामाला ही उशीर झाला.
अशी वेळ आली की हस्ताक्षर स्पर्धेचा जो ग्रुप आहे
तो असाच continue करावा आपल्या बालपणीच्या शालेय आठवणींसाठी.
सगळ्यांना ही कल्पना पटली आणि ग्रुप चे नाव पण विचार करायला सुरुवात झाली. असाच
गप्पा मारत दिवस निघाला आणि आता वेळ आली होती ती निकालाची ज्याच्या मुळे एवढा मस्त
ग्रुप मिळाला, मित्र मैत्रिणींची जवळून नव्याने ओळख झाली.
२, ३ दिवस खुप झटपटीत आनंदात गेले.
निकाल जाहीर झाल्यानंतर विजेत्यांचे खुप कौतुक
आणि शुभेच्छांचा पाऊस पडू लागला. अशाप्रकारे स्पर्धकांचा उत्साह बघून MMAD च्या कमिटी ला पण राहावले नाही आणि त्यांनी पण ग्रुप मध्ये entry घेतली. अशाच आप आपल्या बालपणीच्या, शाळेतील, सुख
दुःख च्या आठवणीनी हा आपला ग्रुप वटवृक्षा सारखा बहरत जावो हीच सदिच्छा.
अबू धाबी महाराष्ट्र मंडळ काय॔कारिणी समिती २०२०-२१
ला खुप धन्यवाद.
No comments:
Post a Comment