कोविड काळ
============
कोविड १९ कोविड १९
कसला आहे हा आजार
रातोरात याने बंद केला
जगातील पैश्याचा बाजार
जात नाही धर्म नाही
नाही कसला
या ला भेदभाव
थैमान घातलेय असे की
उलटला सर्वांचा राजकीय डाव
श्रीमंत असो वा
असो सत्ताधारी
या रोगाने तर बसवले
भल्याभल्यांना घरी
नेहमी घराबाहेर
धावणारे पाय
घरात थांबु
लागले
मोबाइल मुळे दुरावलेली नाती
आपले वाटु
लागले
घर ते ऑफिसचा प्रवास
याने दिवस झाला होता व्यस्त
पैसा झाला होता मोठा अन
जिव झाला होता स्वस्त
फिरायला जाणे मग बाहेरच खाणे
हेच झाले
होते जीवन
घरच्या जेवणाला चवच नसते
असेच झाले होते मन
कोविड ने मात्र जगाला
लावली आहे शिस्त
घरी राहुन सर्वांची
तब्येत झालीये स्वस्थ
पण जिवाशी हा खेळ
आणतोय फार निराशा
लवकर यावर निघावा इलाज
हीच आहे आशा.....
कवयित्री
मंजिरी अजित नाडगौडा
No comments:
Post a Comment