झटपट वरण
किती
व्यक्तींसाठी : २
साहित्य -
वरण 1
कप
टोमॅटो 1
छोटा (बारीक चिरलेला)
लसूण 7-8
पाकळ्या (बारीक चिरलेल्या)
लाल तिखट 1 चमचा
तेल फोडणीसाठी
मोहरी 1
चमचा
हिंग एक चिमूट
हळद एक चिमूट
कसूरी मेथी 1 चमचा
मीठ चवीनुसार
कृती –
कढई मध्ये तेल गरम करावे.
तेल तापले की त्यात मोहरी घालावी.
मोहरी तडतडली की त्यात
हिंग, हळद, टोमॅटो आणि लसूण घालावे. टोमॅटो
शिजेपर्यंत परतून घ्यावे.
आता त्यात शिजवलेलं वरण, लाल तिखट, कसुरी मेथी, आणि मीठ घालावे.
वरून चिरलेली कोथिंबीर
घालावी. खूप सुंदर लागते.
No comments:
Post a Comment