Tuesday, September 29, 2020

सुखी----मनोज करंदीकर

 

*सुखी*

 

अंधारुन आल्या सर्व वाटा

पावलांना चालण्या सांगू कसा मी

 

होते ओळखीचे झाले अनोळखी

ओळख त्यांना दाखवू कसा मी

 

जातात ते दुरुनी टाळण्या मला

माझी वाट आता बदलू कसा मी

 

धुके दाटून आले सर्व दिशांना

माझ्या भावनांना शोधू कोठे मी

 

दिसतात डोंगर दुरुन साजरे

हेच आता सांगतो मला मी

 

आनंद मला आला भेटण्याला 

जेंव्हा मानतो सुखी मला मी !

https://ssl.gstatic.com/ui/v1/icons/mail/no_photo.png

 

मनोज करंदीकर

No comments:

Post a Comment