Tuesday, September 29, 2020

सुरळीच्या वड्या---स्नेहल अनिकेत बागुल

 

सुरळीच्या वड्या



साहित्य
________________________________________
•       
१ वाटी बेसन
•       
१ वाटी  ताक
•       
१ वाटी पाणी
•       
१ लहान चमचा हळद
•       
१/२ लहान चमचा हिंग

•       
फोडणीसाठी : २-३ चमचे तेल, मोहोरी, चिमूटभर हिंग, खोवलेले खोबरे, कढीपत्ता,
बारीक चिरलेली कोथिंबीर
•       
मीठ

कृती
________________________________________
•       
बेसन, ताक, पाणी एकत्र करावे. पीठाच्या गुठळ्या होऊ देऊ नयेत. त्यात हळद आणि हिंग घालावे. चवीपुरते मीठ घालावे.
•       
कढईत सर्व मिश्रण घालावे. मध्यम आचेवर मिश्रण शिजेपर्यंत न थांबता ढवळत राहावे. नाहीतर गुठळ्या होण्याची शक्यता असते.
•       
मिश्रण दाटसर झाले की गॅस बंद करावा.
•       
गरम असतांनाच मिश्रणाचा पातळ थर स्टीलच्या ताटांच्या मागच्या बाजूला पसरावा
•       
गार होईपर्यंत दुसऱ्या कढईत तेल गरम करावे त्यात मोहोरी, हिंग, हळद, कढीपत्ता घालून फोडणी करावी. ही फोडणी पातळ थरावर चमच्याने पसरावी.
•       
त्यावर ओले खोबरे आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालावी. नंतर सुरीने साधारण 2 इंचाच्या पट्ट्या कापाव्यात. त्याची सुरळी/गुंडाळी करावी.
•       
सुरळीच्या वड्यांवर थोडी कोथिंबीर आणि ओले खोबरे घालून सजवावे.

कृतीसाठी लागणारा वेळ : २० मिनिटे
पूर्वतयारीसाठी लागणारा वेळ : १० मिनिटे
एकूण वेळ : ३० मिनिटे
पदार्थाचा प्रकार : स्नॅक्स
किती व्यक्तींसाठी : ४




No comments:

Post a Comment