Tuesday, September 29, 2020

आठवण ....श्रेया पटवर्धन

 

आठवण ....

कधी हसू येते
कधी रडू येते
कधी दुःख देते
कधी आनंद देते
काय आहे ही आठवण ......
अंतर्मनाच्या गाभार्‍यात
कुठल्या तरी कोपऱ्यात
शरीराच्या संवेदनात
हृदयाच्या ठोक्यात
कुठे आहे ही आठवण.....
कितीही विचार केला तरी उमगत नाही
मनातून ती व्यक्ती कधी जात नाही अंतर्मन तिची सोबत सोडत नाही
ती नाही याचा भासही जाणवू देत नाही
किती सुंदर आहे ही आठवण....
आठवणीत सहवास जाणवतो
तिच्याशी माझा संवाद फुलतो
तिचा स्पर्शही मला कळताे
क्षणातच मला सुखावून जातो
किती सुंदर आहे ही आठवण....
माझ्या आईची आठवण....


                                            श्रेया पटवर्धन

No comments:

Post a Comment