Wednesday, September 30, 2020

पाचवे पारितोषिक- सौ. उन्नती नाईक

 


चौथे पारितोषिक - श्री. अजय पडवळ

 




तिसरे पारितोषिक - सौ. मंजुशा जोशी

 


दुसरे पारितोषिक - श्री. श्रीधर सावंत

 






पहिले पारितोषिक - डाॅ. सौ. पल्लवी बारटक्के

 




नम्रता मनीष चिटणीस

 



अन्विता शेरेकर

 


इशान्वी अशोक संभाजी

 



अद्विका गाडगे

 


मानसी करंदीकर

 




रुचिर अक्षय फणसे

 


आदित प्रशांत बलदावा

 


आर्या सचिन अमृतकर

 




स्मिता सरप

 


शीतल अंंबुरे

 


शीतल अमित झळकीकर

 



Tuesday, September 29, 2020

सुरळीच्या वड्या---स्नेहल अनिकेत बागुल

 

सुरळीच्या वड्या



साहित्य
________________________________________
•       
१ वाटी बेसन
•       
१ वाटी  ताक
•       
१ वाटी पाणी
•       
१ लहान चमचा हळद
•       
१/२ लहान चमचा हिंग

•       
फोडणीसाठी : २-३ चमचे तेल, मोहोरी, चिमूटभर हिंग, खोवलेले खोबरे, कढीपत्ता,
बारीक चिरलेली कोथिंबीर
•       
मीठ

कृती
________________________________________
•       
बेसन, ताक, पाणी एकत्र करावे. पीठाच्या गुठळ्या होऊ देऊ नयेत. त्यात हळद आणि हिंग घालावे. चवीपुरते मीठ घालावे.
•       
कढईत सर्व मिश्रण घालावे. मध्यम आचेवर मिश्रण शिजेपर्यंत न थांबता ढवळत राहावे. नाहीतर गुठळ्या होण्याची शक्यता असते.
•       
मिश्रण दाटसर झाले की गॅस बंद करावा.
•       
गरम असतांनाच मिश्रणाचा पातळ थर स्टीलच्या ताटांच्या मागच्या बाजूला पसरावा
•       
गार होईपर्यंत दुसऱ्या कढईत तेल गरम करावे त्यात मोहोरी, हिंग, हळद, कढीपत्ता घालून फोडणी करावी. ही फोडणी पातळ थरावर चमच्याने पसरावी.
•       
त्यावर ओले खोबरे आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालावी. नंतर सुरीने साधारण 2 इंचाच्या पट्ट्या कापाव्यात. त्याची सुरळी/गुंडाळी करावी.
•       
सुरळीच्या वड्यांवर थोडी कोथिंबीर आणि ओले खोबरे घालून सजवावे.

कृतीसाठी लागणारा वेळ : २० मिनिटे
पूर्वतयारीसाठी लागणारा वेळ : १० मिनिटे
एकूण वेळ : ३० मिनिटे
पदार्थाचा प्रकार : स्नॅक्स
किती व्यक्तींसाठी : ४




झटपट वरण ---सौ. शीतल अमित झळकीकर

 

झटपट वरण


किती व्यक्तींसाठी :

 

साहित्य -

वरण                             1 कप

टोमॅटो                           1 छोटा (बारीक चिरलेला)

लसूण                            7-8 पाकळ्या (बारीक चिरलेल्या)

लाल तिखट                   1 चमचा

तेल                               फोडणीसाठी

मोहरी                            1 चमचा

हिंग                               एक चिमूट

हळद                             एक चिमूट

कसूरी मेथी                    1 चमचा

मीठ                              चवीनुसार

 

 

कृती

कढई मध्ये तेल गरम करावे. तेल तापले की त्यात मोहरी घालावी.

मोहरी तडतडली की त्यात हिंग, हळद, टोमॅटो आणि लसूण घालावे. टोमॅटो शिजेपर्यंत परतून घ्यावे.

आता त्यात शिजवलेलं वरण, लाल तिखट, कसुरी मेथी, आणि मीठ घालावे.

 

वरून चिरलेली कोथिंबीर घालावी. खूप सुंदर लागते.




 

चिरोटे---प्रियांका गाडे

 

खुखुशी

चिरोटे

पाककृती

 

 

 

साहित्य –

 

क्र.

साहित्य   

प्रमाण

मैदा

३ वाटी

रवा

१/२ वाटी

कॉर्न फ्लॉवर

३ चमचे

तेल

पाव वाटी

तूप   

पाऊण वाटी

मीठ

चवीनुसार

पिठी साखर

२ वाटी

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

कृती –

१.     एका ताटामध्ये पाऊण वाटी तूप विरघळेपर्यंत पळीने फेटून घ्या.

(टीप – गॅसवर गरम करू नये)

२.     मैदा आणि रवा चाळून घ्या.

३.     विरघळलेल्या तुपात रवा-मैदा मिसळून घ्या.

४.     चवीनुसार मीठ टाका(अर्धा चमचा).

५.     पाव वाटी कडकडीत तेलाचे मोहन घाला.

६.     हे सगळे मिश्रण पाणी टाकून हळू हळू मळून घ्या.

७.     पुरी सारखे घट्ट पीठ मळून घ्या.

८.     २ तास झाकून ठेवा.

९.     २ तास नंतर हे पीठ परत एकसारखे मळून घ्या.

१०.  सगळ्या पिठाचे पोळीसाठी करतात तसे समान आकाराचे गोळे करा.

११.  एका वाटीत २-३ चमचे कॉर्न फ्लॉवर घेऊन त्यात अंदाजे तेल टाकून सरसरीत पेस्ट करून घ्या.

१२.  केलेल्या गोळ्यांपैकी ३ गोळ्यांच्या पोळ्या लाटून घ्या.

१३.  एक पोळी घेऊन त्यावर कॉर्न फ्लॉवर ची पेस्ट व्यवस्थित पूर्ण पोळीवर लावून घ्या.

१४.  ह्या लावलेल्या पेस्टवर दुसरी केलेली पोळी ठेवा.

१५.  पहिल्या पोळी प्रमाणे दुसर्‍या पोळीवर सुद्धा ही पेस्ट व्यवस्थित लावून घ्या.

१६.  त्यावर तिसरी पोळी ठेवा आणि उरलेली पेस्ट त्यावर व्यवस्थित लावून घ्या.

१७.  ह्या तिन्ही पोळ्या रोल करून घ्या.

(टीप – ३ एव्हजी २ पोळ्यांचा रोल सुद्धा चालेल)

१८.  अश्या पद्धतीने उरलेल्या पोळ्यांचे रोल करून घ्या.

१९.  रोल केलेल्या पोळ्यांचे समान आकाराचे तुकडे सूरीने करून घ्या.

२०.  एक एक तुकडा घेऊन तो मध्यावर हलक्या हाताने लाटून घ्या.

२१.  अशाप्रकारे सगळे चिरोटे लाटून घ्या.

२२.  हे लाटलेले चिरोटे मंद आचेवर, छान पदर सुटेपर्यंत, गुलाबी रंग येईपर्यंत तळून घ्या.

२३.  हे तळलेले चिरोटे दोन्ही बाजूंनी पिठीसाखरेमध्ये घोळून घ्या.

२४.  हे पिठीसाखरेमध्ये घोळेलेले चिरोटे टिशू पेपरवर थोडा वेळ ठेवा.(एकावर एक न ठेवता वेगळे ठेवा)

२५.  तुमचे खुखुशी चिरोटे तयार...!!!

 

 

 






 

                                                     प्रियांका गाडे.

फणसाची भाजी----मनाली सहस्रबुद्धे

 

साहित्य :

मध्यम आकाराचा कापा फणस,शेंगदाणे,ओलं खोबरं, गुळ, ,३ सुक्या लाल मिरच्या,तेल,हळद,लाल तिखट, हिंग, मोहरी, कडीपत्ता, मीठ.

 

कृती :

प्रथम फणस व्यवस्थित तेलाचा हात घेऊन सोलून घ्यावा. नंतर फणस चिरून त्याचे तुकडे आणि शेंगदाणे एकदा चांगले शिजवून घ्यावे. शिजवलेला फणस आणि शेंगदाणे निथळण्यासाठी ठेवून फोडणीची तयारी करावी.

प्रथम एका कढईत तेल गरम करून घ्यावे.त्यात मोहरी,हिंग,हळद,,३ लाल मिरच्या,कडीपत्ता घालून खमंग फोडणी करावी. फोडणीत शिजेलेला फणस व शेंगदाणे घालून नीट परतून घ्यावे.त्यात थोडे पाणी घालून ओलं खोबरं,गुळ घालून चांगलं एकजीव करून घ्यावं. चवीनुसार मीठ घालून एकदा चांगली वाफ काढावी.

 

तळ टीप :

भाजी तयार झाल्यावर वाढायच्या आधी त्याला वरून पुन्हा एकदा फोडणी द्यावी.

भाजीत पाणी अगदी अंगासरशी ठेवावे.

 

वरून कोथिंबीर पेरून गरमा गरम भाजीचा आस्वाद घ्यावा.