धुकं
...
आज पहाटेच डोळ्यातून झोप निसटली
बाहेर पाहिले तर धुक्याची लाट दिसली
मन पार कुठेतरी जाऊन पोहोचलं
चाचपडत कुठेतरी थांबलं
अंधुक काहीतरी चमकलं
नीट बघितलं तर माझं मनच दिसलं
म्हटलं काय बरं सांगायचे आहे तुला
मन म्हणालं काहीतरी विचारायचे आहे तुला
मी विचारले तू आणि मी काही वेगळे आहोत का ?
तर प्रत्युत्तर आलं हे तु स्वतःलाच विचारते आहेस
का ?
मी म्हटलं काय सांगू माझी व्यथा दुःखाचे डोंगर
पसरलेत
मन अलगद उत्तरलं हे तुझे तुलाच पार करायचेत
मी विचारले काही इलाज आहे का ?
तर प्रश्ण आला तुझी इच्छा आहे का ?
मी म्हटलं फार धुकं दाटलय पुढचं काही दिसत नाही
तर म्हणतय कसं अगं थोडी पुढे जा आता फार वेळ
नाही
जरा पुढे गेले तर पुढे स्वच्छ प्रकाश होता
मन म्हणाले गेला तो गतकाळ होता....
श्रेया पटवर्धन
No comments:
Post a Comment