दिवस बदलतील
आज खूप दिवसानंतर सकाळी सकाळी
गच्च ढगांनी भरलेलं आकाश बघितलं
जणू मला काही तरी सांगायचा प्रयत्न करत होतं
मी बघतच राहिलें
काय असू शकतं ?
विचार करतच होते, इतक्यात
सगळ्या ढगांनी मला घेरलं
आणि म्हणू लागले
"दिवस बदलतील "?
तापणारा सूर्य तुला आता
कसलाच त्रास नाही देणार
तापलाच तरीही तुला त्याचा
त्रास नाही होणार
सगळं कसं आता थंड होईल
आम्ही कायम तुला शांत ठेवायचा
प्रयत्न करणार
उब मिळावी म्हणून तू
शाल पांघरशील आणि सुखावशील
पण काही महिन्यांनी जेव्हा तो
परत तसाच तापेल
तेव्हा मात्र तुझ्या अंगात
ते तापणं पेलण्याची ताकत यायला हवी
स्वतः ला कसा त्रास होऊ न देणं
ह्याचा प्रयत्न तूच करायला हवा
तूच करायला हवा
जास्त तापला तर
येऊच आम्ही थंड करायला
पण तेव्हाही जर तू शाल ओढलीस
तर त्याचा त्रास तुलाच होईल
चल .... आता हस बघू
येत्या थंडीत ते तापण विसरून जा
दिवस बदलतील, दिवस बदलतील
एवढं सांगून माझ्यात एक
आत्मविश्वास जागवून ते नाहीसे झाले
मी हि ठरवलं
खर उन्हाचा त्रास होऊ देणार नाही मी
ह्या पुढे माझी रक्षा मीच करीन
स्वतःला एवढी समर्थ मी बनविन की
त्या तापत्या उन्हात
मी करपून जाणार नाही
मी करपून
जाणार नाही
रुपाली मावजो कीर्तनी
No comments:
Post a Comment