तेजोमय तारा
काटेरी
रस्त्यावरून चालायचे आहे
मखमली
फुले वेचत
मतलबी
ह्या दुनियेमध्ये
स्वतःला
सिद्ध करत
वेगवेगळे
मुखवटे इथे
आपले
कुणीच नसे
बदकांच्या
ह्या गर्दीमध्ये
राजहंस
तुला बनायचे आहे
पावलोपावली
खाचखळगे
दिशाभूल
करती सभोवतीचे नजारे
चढ
उतारांचा येईल घाट
निश्चयाने
त्यातून काढ वाट
गरुडझेप
तुझी अस्मानी
छाटू
पाहतील पंख तुझे
राखेतून
नव्याने जन्म घे
पंखांना
गगनभेदी बळ दे
होऊ
नकोस निराश
सोडू
नकोस धीर
तू
लढ प्राणपणाने
अन
बन विजयीवीर
तमाच्या
घनघोर निशेनंतर
उजळेल
आसमंत सारा
कारण
आयुष्याच्या क्षितिजावर आता,
उगवला
असेल तेजोमय तारा
उगवला
असेल तेजोमय तारा
-डॉ पल्लवी प्रसाद बारटके
No comments:
Post a Comment