Saturday, January 30, 2021

वाटलं नव्हतं ------- -रुपाली मावजो किर्तनी

 

वाटलं नव्हतं

 

बाहेर पडायला निमित्य शोधणारे, बाहेर निघायला घाबरतील

स्वतःच्याच घरची दारं, भिंती वाटायला लागतील

वाटलं नव्हतं कधी असेही दिवस येतील

 

करोनाचे मुखवटे डोळ्या समोर तांडव करतील

तोंड बंद करून सगळे हताश होऊन बघत बसतील

वाटलं नव्हतं कधी असेही दिवस येतील

 

माणसं माणसं एकमेकांना बघायला अशी आसुसतील

इंटरनेटवर भेटून  असे खबर बात घेत राहतील

वाटलं नव्हतं कधी असेही दिवस येतील

 

बाहेरचं काही खायच्या आधी लोकं इतका विचार करतील

हॉटेल हॉटेल खेळणारे असे घर घर खेळायला लागतील

वाटलं नव्हतं कधी असेही दिवस येतील

 

सुट्टीची वाट बघणारे घरी बसून कंटाळतील

हात मिळवणारे सुद्दा हात जोडू लागतील

वाटलं नव्हतं कधी असेही दिवस येतील

 

पैसा हातात असूनही लाचार सगळे होतील

स्वतःच्याच घरच्या वाटा अचानक हरवल्या सारख्या वाटतील

वाटलं नव्हतं कधी असेही दिवस येतील

 

वाटलं नव्हतं कधी असेही दिवस येतील

कोविडच्या हातात वेगवर्धक आणि आपल्या हातात गियरअसतील

वेगाने धावणारे सगळे अशे कोविडच्या वेगाला दचकतील

वाटलं नव्हतं कधी असेही दिवस येतील

 

वाटलं नव्हतं कधी असेही दिवस येतील

पण खात्री नक्कीच आहे,

हे ही दिवस जातील...

हे ही दिवस जातील

    -रुपाली मावजो किर्तनी

No comments:

Post a Comment