आईबाबा
आई बाबा असे
दैवत आहे, ज्याला मंदिराची गरज नाही,
आमच्या ह्रदयात तुमच्या आठवणी सतत राहील.
आम्हाला करून पोरके, निघून
गेलात दोघेही पाठोपाठ,
आता आमच्या पाठीवर कोणी द्यावी शाबासकीची थाप.
म्हणतात आई वडील काय आयुष्याला पुरतात,
पण मुलांना तर ते जगात हवेच असतात.
आई वडील म्हणून तुम्ही पार पाडली तुमची कर्तव्ये,
सर्वांना प्रेम देवून जिंकून ठेवली आहेत
सगळ्यांची मने.
आई बाबा तुमचा आशिर्वाद असावा आमच्या पाठीशी,
जबाबदारीने वागण्याचे बळ मिळावे हिच प्रार्थना
देवापाशी.
No comments:
Post a Comment