व्यक्ती तितक्या
तिळगुळाच्या प्रकृती !
तिळगुळ घ्या गोड गोड बोला
आमच्या तिळगुळाची बाई वेगळीच तऱ्हा
मृदू आणि कोमल स्वभावाचे लाडू अगदी मऊ
अशा व्यक्तींना बाई लगेच येते रडू
काहींचे लाडू असतात अगदी चिवट
अशा व्यक्ति बाई असतात अगदी चावट
कणखर स्वभावाचे लाडू अगदी कडक
अशा व्यक्ती रागाने निघून जातात तडक
अशीच आहे आमच्या जीवनाची तऱ्हा
कायम हसा आणि निरोगी रहा
सौ श्रेया पटवर्धन
No comments:
Post a Comment