व्यायाम
......
फिटनेस आणि व्यायामाची आहे आपल्याला गरज
रुटीन फॉलो केल्याने जीवन होते सहज
जसा वेळ मिळेल तसा थोडा व्यायाम करा
दिवसभर मग तुमचा मूड राहील बरा
थोड स्ट्रेचिंग करून परत आणा तुमचा उत्साह
सर्व रोग व्याधींना करून टाका कालबाह्य
प्राणायाम करून हृदयाला द्या भरपूर ऑक्सिजन
आयुष्य वाढून मग आनंदी होईल सहजीवन
ध्यानस्थ बसून कधी मनाला घाला आवर
फक्त सद्विचारांचा हृदयात राहील वावर
ओंकार करून कधी आज्ञा चक्रावर लक्ष केंद्रित करा
वैश्विक ऊर्जा घेऊन आपले जीवन सहज करा
श्रेया पटवर्धन.....
No comments:
Post a Comment