करोना
- वर्ष धास्तीचे
जगाच्या एका कोपऱ्यात कोणी मारून खाल्लं
वटवाघळाला .
आणि त्यातूनच हा कोविद विषाणू म्हणे निपजला
बघता बघता साऱ्या जगाला त्याने विळखाच की
हो घातला
साथीने त्याच्या देशोदेशी मृत्यूचा आकडा वाढतच
गेला
महासत्ता असो की असो छोटा देश कोणीच नाही सुटला
शहरे,गांवे
,गल्लोगल्ली तो वेगाने पसरू लागला
मृत्युच्या या थैमानाला उपाय एकच टाळेबंदीचा
ठप्प झाला बघता बघता व्यवहार साऱ्या जगाचा
समस्त मानव जमात सक्तीच्या कैदेत गेली
सारी सृष्टी मग त्याच्या त्रासातुन मुक्त झाली
हवा,पाणी,निसर्ग
सारे प्रदुषणमुक्त झाले
मानव सोडुन सारे प्राणी मुक्त वावरू लागले
निसर्गाने मानवाविरुद्ध बंडच जणू पुकारले
एका विषाणूने त्याला हतबलच करून टाकले
सारे विज्ञान सारे शोध त्याच्यापुढे फोल ठरले
जगभरचे संशोधक नवी लास शोधण्या सरसावले
कधी होईल ?काय
होईल?सारे जण धास्तावलेले
परदेशात आम्ही स्वकीयांसाठी घाबरलेले
तेथील कोविदवीरांसाठी आम्ही इथे टाळ्या वाजवल्या
त्यांच्यासाठी आमच्या घरीही दिवे,पणत्या
उजळल्या
अनेकांच्या आप्तांचे भारतात मृत्यू झाले
टाळेबंदीमुळे त्यांना अंत्यदर्शनही नाही घडले
प्रत्येकाची कथा वेगळी प्रत्येकाची व्यथा वेगळी
राजा असो वा रंक कोविदसाठी एक पातळी
टाळेबंदी पाठोपाठआता आली जागतिक मंदी
बेकारांसाठी कुठुन मिळणार रोजगारांची संधी
स्वछता पाळा -गर्दी टाळा फक्त इतकेच हाती उरले
धावणाऱ्या जगाला कोविदने थोडं थांब असं म्हटले
थांबुन जरा विचार कर कुठे काय चुकले ?
कुठे
काय चुकले ?
----
सौ.नम्रता नितिन देव.
No comments:
Post a Comment