Saturday, January 30, 2021

विरह स्वप्न-----शैलेश मालुसरे

 

विरह स्वप्न

 

सकाळची किरणे आली गालावर  तर समजून घे माझ्या प्रेमाचा स्पर्श झालाय,

आणि वारयाची एखादी झुळूक जाणवलीच आणि अलगद हसू आले  तर मीच एक फुंकर मारली आहे.

रोमांचित वाटले जर तुला एक क्षणभर जरी, तर पाहिले असेन मी तुला स्वप्नातूनी.

केसांकड़े बघ, मोकळे असतील, आठवेन मी मग तुला. अलगद एक एक बट सोडव, आठवेल तुला आपला एक एक संवाद..

आणि चुकुन वारा घोंगावत आलाच तर... तर 

असेल ती माझी उत्कटता आणि तुझी पण...

भेटीसाठी आसुसलेली ....

पण ह्यावेळी मात्र दार आणि खिडक्या बंद कर, पडदा घे ओढून आणि निघुन जा वास्तविकतेच्या दुनियेत

मी थोडासा उरलेला असेनच तुझ्या अंतर्मनात , हाक दे लाडिक आणि मला पण स्वप्नातून जागे कर,

 

शैलेश मालुसरे

No comments:

Post a Comment