तिळ - गुळ पोळी
सारण
• 1 वाटी- किसलेला गुळ
• ½ वाटी-तीळ बारीक केलेली
• ½ वाटी- बेसन पीठ
1. बेसन पीठ तेलात तपकिरी रंग येईपर्यंत भाजून घेणे.
2. पीठ थंड झाल्यावर त्यात गुळ व तीळ एकत्र करून घेणे , घटृट गोळा करून घेणे.
पोळी
• 1 वाटी - मैदा
• ¼ वाटी- बेसन पीठ
1. मैदा आणि बेसन पिठात गरम तेल टाकून एकत्र करून घेणे नंतर पाणी टाकून
मऊसर गोळा करणे.
2. समान आकाराच्या 2 पोळ्या लाटून घेणे, एका पोळी वर सारण पसरून दुसरी पोळी
त्या वर ठेऊन हलक्या हाताने लाटून घेणे.
3. डिम गॅस वर 5 मिनिट दोन्ही बाजूने शेकणे.
( थंड होईपर्यंत एकमेकांवर ठेऊ नये. नाहीतर एकमेकांना चिकटतात. )
संक्रांती स्पेशल तीळ-गुळ पोळी तयार...
सौ.मोहिनी योगेश अमृतकर
No comments:
Post a Comment