भोगीची
भाजी
साहित्य :
१ मोठा बटाटा, सोलून
मध्यम फोडी
३ ते ४ लहान वांगी
१ कप गाजराचे मध्यम तुकडे
१/२ कप हिरवे हरभरे
१/४ कप भिजवलेले शेंगदाणे
१/४ कप घेवडा
१/४ कप वाल
२ शेवग्याच्या शेंगा
फोडणीसाठी - तेल,मोहोरी,हिंग,हळद,लाल
तिखट,३-४ कढीपत्ता,भाजलेल्या
तिळाचं कूट,गोडा मसाला,चिंचेचा
दाट कोळ,गूळ,ओलं
खोबरं,मीठ
कृती:
१) कढईत तेल गरम करून मोहोरी,हिंग,
हळद,
लाल
तिखट, आणि कढीपत्ता घालून फोडणी
करावी.
२)प्रथम बटाटा,हरभरे,
घेवडा,
वाल,
शेवग्याच्या
शेंगा आणि शेंगदाणे घालून २ वाफा काढाव्यात.
३) नंतर वांगं आणि गाजर घालून मिक्स करावे. थोडे
पाणी घालून पातेल्यावर झाकण ठेवावे. मध्यम आचेवर शिजू द्यावे.
४) भाज्या शिजत आल्या कि चिंच कोळ आणि गोडा
मसाला घालावा तसेच लागल्यास थोडे पाणी घालावे.
५) भाज्या शिजल्या कि गूळ, तिळाचं कूट,
खोबरं
घालावे. लागल्यास चव पाहून मीठ घालावे.
६)एक उकळी काढून तीळ आणि बाजरीच्या भाकरीबरोबर
गरमागरम भाजी सर्व्ह करावी.
No comments:
Post a Comment