Saturday, January 30, 2021

आई च माहेरपण......पिनल चौधरी!!!

 

आई च माहेरपण......!!

 

आभाळभर क्षण साठवले आहेत तुझ्यासाठी

आई,येना ग तू माझ्या घरी माहेरपणासाठी

विशेष अस काही करणार नाही

पण तुला तुझा वेळ देईल एवढ मात्र  नक्की

 

आई – येना ग तू माझ्या घरी माहेरपणासाठी

 

मला म्हणतेस.. नेहमी तुझी बाई घाई नुसती

तुझ्या घरच ठेऊन मगच येत जा माहेरी

तशीच तूही येना ग

लेकी कडे ४ दिवसाच्या माहेरपणासाठी

 

माझ्याशिवाय कोणी नसणारे हो घरी

नसणार तुझा जावाई आणि

नसेल तुझ्या नातवंडांचा गोंधळही!

अगदी निवांत रहा मग लेकीच्या घरी

 

आई – येना ग तू माझ्या घरी माहेरपणासाठी

 

बघ खाऊन मुलीच्या हातचा मऊ मऊ भात

तुझ्या सारख वरण नाही जमणार

पण बसलाय जरा जम माझा पण

स्वयंपाक घरात.....

 

सगळ्यांच सगळ करतेस

नेहमी कामाला तत्पर असतेस

कधी मनातल बोलणार नाहीस

पण दमतेस ना ग आई?

 

आई - येना ग तू माझ्या घरी माहेरपणासाठी

 

तुझ्या केसात तेल लाऊन देईल

तुला झोपाळ्यावर चहा आणून देईल

तुझे खूप खूप लाड करायचे आहेत

लेकी सारख तुला जपण्यासाठी

 

आई – येना  ग तू माझ्या घरी माहेरपणासाठी

 

आपल्यालाही  तर निवांत वेळ मिळेल

गप्पा मारू... फिरायला  जाऊ...गाणी ऐकू....

आपल्या मैत्रीच्या वाटेवर

चल एक फेरी मारून येऊ

 

म्हणून म्हणते.....

आई – येना ग तू माझ्या घरी माहेरपणासाठी

 

पिनल चौधरी!!!

 

No comments:

Post a Comment