परतीच्या वाटेवर
आला जावयाचा दिन
आठवणी जाग्या झाल्या
आठवणीत रंगलो
भूतकाळ ताजा झाला ||१||
आलो होतो एके काळी
येथे नशीब काढाया
थोडे दिन येथे राहू
मग जाऊया घराला ||२||
सरा सरा वर्षे गेली
काळ गेला हा चांगला
पैसा आला सुख आले
परी ओढ लागे ही जीवाला ||३||
सर्व काही येथे आहे
सुख, शांतता, सुबत्ता
पण आहे काही उणं
जाणवतं रिते पण ||४||
आई बाप थकलेले
आस त्यांना लेकराची
माझ्यासाठी काही करा
हाक आली भारताची ||५||
आणि म्हणून चाललो
एक खूणगाठ ध्यानी
जे का रंजले गांजले
त्यांची सेवा आहे मनी ||६||
- धनाग्रज
No comments:
Post a Comment