आपली माणसं
वाढलंय हल्ली बी. पी. आणि शुगर.....
हायपर टेन्शन च्या गोळ्या घेऊन भरून
काढतोय कसर!
24 बाय 7 कनेक्टेड असून देखील... मनमोकळं
कुठे करता येत??
सोशल मीडियेच्या ह्या दुनियेत....प्रदर्शनाचं
फसवं नाणं जिथे चालतं!
लोकं काय म्हणतील...म्हणून व्यक्त होणं
झालंय कमी...
आणि म्हणूनच......घट्ट होत चालल्या मना
मधल्या अढी!
नुसताच मेसेज काय करतोस....कर एखादा
फोन....
बघ किती हलकं वाटेल मग....मारल्यावर
गप्पा एक दोन!
भौतिक सुखं कमावताना...आपली माणसे सुद्धा
जमवा...
नाहीतर काय उपयोग...कितीही संपत्ती कमवा!
आपली माणसं जपा....हसण्यासाठी, रडण्यासाठी,
भरपूर गप्पा मारण्यासाठी....
हीच खरी औषधं आहेत....सर्व रोगांपासुन्
वाचण्यासाठी!
नम्रता चिटणीस
No comments:
Post a Comment