संधीप्रकाश....
दूर-दूर नभामधे
रंग खेळत कोणी
मी म्हणते ही रंगांची उधळण केली कोणी
संध्यारंग पसरला की मन होऊन जाते बेभान
गतव्यक्तींच्या आठवणीला येते उधाण
त्यात माझी आई आहे या भावनेने जीव होतो व्याकुळ
का गेलीस ग आई सोडून हे घरकुल
परत एकदा दृष्टी जाते नभाकडे
ते सांगते एक दिवस सगळ्यांना यायचे आहे
माझ्याकडे
क्षणातच एक पक्षी सहज उडत जातो
म्हणतो तुझ्या आईला तुझी खुशाली सांगतो
सहज त्या रंगात मला आई दिसते
तिच्या आभासाने माझे मन सुखावते.....
श्रेया पटवर्धन
No comments:
Post a Comment