Saturday, January 30, 2021

संक्रांत -----सौ .नम्रता नितीन देव

 

संक्रांत 

इवलासा तीळ त्यावर नाजुकसा काटा 

असा गोड तिळगुळ साऱ्यांना वाटा 

तिळगुळ घ्या आणि गोड़ गोड़ बोला 

गोडवा घेऊन असा संक्रांत सण आला 

काळया झबल्यात नी हलव्याच्या साजात 

गोड़ गोजिरा बाळराजा  सजला 

चुरमुरे नी बोरांचे बोरन्हाण त्याला 

काळी चंद्रकळा दिली नव्या सुनबाईला 

हलव्याच्या दागिन्यांचा साजशृंगार केला 

सुवासिनींना हळदीकुंकू नि वाणवसा दिला 

चांदीच्या वाटीत तिळगुळ नव्या जावयाला 

गुळपोळीचा खास बेत घरोघरी झाला 

काळा रंग उब देतो तिळगुळाची उर्जा शरीराला 

ऋतूनुसार आहारविहार हाच विचार सणाला  

असा गोड़ संक्रांत सण वर्षारंभी आला 

वर्षभरासाठी नात्यांमधें गोडवा देऊन गेला 

     

                          सौ .नम्रता नितीन देव 

 

No comments:

Post a Comment