आमचे अहो
आमच्या
अहोंची बाई
गोष्टच
निराळी
शॉपिंग चे नाव घेतले की कारणं सांगतात वेगवेगळी
.
आता मलाही कळायला लागली
त्यांच्या स्वभावातील खोडी,
काही मागाचे असेल तर
मलाही करावी लागतात नाटकं थोडी थोडी.
आमच्या अहोंची बाई गोष्टच निराळी
कार्य प्रसंगात शोभून
दिसावी आपली जोडी ,
म्हणून घेवून देत असतात, ड्रेस सोबत सुंदर साडी.
पण तुलातर आहेच नाही
साडी नेसायची गोडी,
असे म्हणून देत असतात
कारणं निरनिराळी.
आमच्या अहोंची बाई गोष्टच निराळी
घरी येणाऱ्या पाहुण्यांची करायला
आवडते सरबराई,
जेवायला बेत मात्र लागतो विदर्भीय स्टाईल लय
भारी,
अतिथीला देव मानावा अशी
भावना आमच्या घरी.
आमच्या अहोंची बाई गोष्टच निराळी
स्वभाव शांत आणि साधी
आहे बोली,
पण एकदा ओळख झाली की, सांकेतिक भाषा वापरून आवरावे लागते,
अहो आता ओळख खुप झाली.
आमच्या अहोंची बाई गोष्टच निराळी
पहिला नंबर असतो कुणाला
मदत करायच्या वेळी,
घरकामातही करतात मदत
मला थोडी थोडी,
नाते जपायला सतत करत
असतात तडजोडी.
आमच्या अहोंची बाई गोष्टच निराळी
क्रिकेट खेळायला जातात
उठून भल्या सकाळी,
कारण त्यांना माहीती
असते, शुक्रवारच्या सुट्टीची वाट बघत असतात घरची
मंडळी.
आमच्या अहोंची बाई गोष्टच निराळी
सर्वांच्या जपतात आवडी
निवडी,
आणि विसरून जातात स्वतः
ला असलेली गोडी,
यावरून होते आमच्यात
वादावादी थोडी.
आमच्या अहोंची बाई गोष्टच निराळी
आमच्या घरात सुरू असते
अशीच थट्टा मस्करी,
अशाच आशिर्वादासाठी
आम्ही आहोत देवाचे आभारी
या पेक्षा दुसरं काय
मागावे देवा जवळी
आमच्या अहोंची बाई अशीच
आहे ,गोष्ट निराळी.
अशीच आहे गोष्ट निराळी.
सौ. अंजली निलेश
उज्जैनकर
No comments:
Post a Comment